#DailyAttended विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीसाठी अनोखा उपक्रम*


*विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीसाठी अनोखा उपक्रम*

✍️ *धर्मराज प्राथमिक शाळेत आयोजन*
👉 *दररोजच्या १००%उपस्थितीवर विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन*
✍️ *शाळा स्तरावर सुरु केली अनोखी निकोप स्पर्धा*
*मुख्याध्यापक बढिये यांचा अनोखा उपक्रम*


नागपूर - शाळेत मूल आल्यानंतर ते नियमितपणे टिकले पाहिजे तरच शैक्षणिक विकास घडून येईल. मुलांच्या याच नियमिततेला शिस्त लावण्यासाठी धर्मराज प्राथमिक शाळा, कांद्री-कन्हानचे मुख्याध्यापक श्री बढिये यांनी *दररोजच्या १०० % उपस्थितीसाठी अभिनंदन वर्ग* हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या अनोख्या उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे.


नवीन शैक्षणिक सत्रातील शाळेला जुलै पासून सुरुवात झाली आहे. शैक्षणिक सत्रात पालकांच्या आग्रहास्तव किंवा कामानिमित्त विद्यार्थी शाळेला बुट्टी मारतात. तर काही विद्यार्थी अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून विविध कारणांचे सबब पालकांपुढे करुन शाळेत येण्याचे टाळतात. या मुलांच्या गैरहजेरीमुळे संबंधित दिवसाच्या अभ्यासक्रमापासून तो विद्यार्थी मुकतो आणि पुढे शिकवलेले काही समजत नाही असे कारण पुढे करतो. यातून मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे तसेच गळतीचे प्रमाण वाढते.
धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांचे शाळाबाह्य विद्यार्थी चळवळीत निरंतर काम आहे. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबतच उपस्थितीची स्पर्धा ठेवली तर विद्यार्थ्यांमध्ये वर्गाविषयी व शिक्षकांविषयी प्रेम निर्माण होईल. या निकोप हेतूने तो शाळेत नियमितपणे उपस्थित राहिल. हाच हेतू लक्षात घेऊन मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी यावर्षी पासून २० जुलै २०२४ ते २० जानेवारी २०२५ पर्यंत ही स्पर्धा शाळास्तरावर आयोजित केली. या कालावधीत ज्या वर्गाची १००% उपस्थिती राहिल त्या वर्गाच्या बाहेर *१००% उपस्थितीसाठी अभिनंदन वर्ग* हा फलक दिवसभर लावण्यात येणार आहे. तसेच सर्व वर्गामध्ये निकोप स्पर्धा निर्माण करुन वर्षभरात जास्त १००% उपस्थिती ठेवणा-या वर्गाचा, वर्गशिक्षकांचा *२६ जानेवारीला* प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच वर्षभरात अविरत १००% उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुध्दा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांच्या मार्गदर्शनाखालीच सन २०२३-२४ मध्ये धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हानला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सौम्या शर्मा व तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथ) रोहिणी कुंभार यांच्या हस्ते जिल्ह्य़ातील पहिली खाजगी शाळेला ISO 9001-2015 प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुख्याध्यापक श्री बढिये यांनी सुरु केलेल्या या अभिनव उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे.


----------(बाॅक्स साठी) - - - - - - -
*उपस्थितीसाठी कौतुकास्पद प्रयोग*
विद्यार्थी विकासासाठी अविरत कार्यरत असलेले श्री बढिये उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या १००% उपस्थितीसाठी त्यांनी सुरु केलेला उपक्रम हा निश्चितच कौतुकास्पद असून त्या माध्यमातून शाळाबाह्य व गळतीचे प्रमाण थांबवण्यास मदत होईल.

*श्री कैलास लोखंडे*
गटशिक्षणाधिकारी, पं.स.पारशिवनी
-------------------------------


*अभिनव उपक्रमाचा फायदा जिल्हाभर करु*

शिक्षकांकडून शैक्षणिक कार्य दर्जेदार करण्यासाठी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती असणे आवश्यक आहे. श्री बढिये यांची संघटनात्मक व शैक्षणिक पातळीवर असलेली धडपड शैक्षणिक विकासासाठी प्रेरक आहे. हा अभिनव उपक्रम जिल्हाभर राबवून उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत होईल.

*श्री निखिल भुयार*
उपशिक्षणाधिकारी जि. प. नागपूर
---------------------------------


*शैक्षणिक विकासासाठी प्रेरक*

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी या सत्रात सुरु केलेला हा उपक्रम शैक्षणिक विकासासाठी प्रेरक ठरेल. इतरही शाळा याचे अनुकरण करतील असा विश्वास आहे.

*श्री मिलिंद वानखेडे*
शिक्षक नेते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा