शासनाचा धोरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश मोर्चा


*आक्रोश महामोर्चा*
*२५ सप्टेंबर २०२४*
काल दि. २५ सप्टेंबर २०२४ ला सर्व जिल्हा परिषद शिक्षक संघटना व खाजगी शिक्षक संघटना यांचा एकत्रित आक्रोश मोर्चा यशवंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी राज्यव्यापी आक्रोश महामोर्चात *विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाने* पूर्ण ताकतीनिशी सहभागी होऊन संघटनात्मक भूमिका व्यक्त केली.


शासन वेगवेगळे अन्यायकारक धोरण आणून जिल्हा परिषद शिक्षक आणि मराठी शाळा मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करीत आहे. याविरुद्ध बंड पुकारणे गरजेचे आहे.


सर्वांना जुनी पेन्शन लागू करा, १५ मार्चचा सुधारित संच मान्यता निर्णय रद्द करा, ५ सप्टेंबरचा कंत्राटी शिक्षक भरतीचा जीआर रद्द करा, ऑनलाइन कामे बंद करा, अशैक्षणिक कामे बंद करा.. अशा अनेक प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या..


एक दिवसाच्या रजा आंदोलनाने सरकार वर दबाव पडणार नाही. त्यासाठी Vote for OPS सारखे. शिक्षक न्याय हक्कासाठी मतदानाचे शस्त्र उभारणे गरजेचे आहे. *या आंदोलनात विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभागी झाला होता*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा