धर्मराज शाळेतील विद्यार्थ्यांना रोटी फाऊंडेशनच्या सहकार्याने दिवाळी स्नेहभेट*


Rotifoundation *धर्मराज शाळेतील विद्यार्थ्यांना रोटी फाऊंडेशनच्या सहकार्याने दिवाळी स्नेहभेट

कन्हान - येथील धर्मराज प्राथमिक माध्यमिक शाळेत जागतिक अन्न दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना रोटी फाऊंडेशनच्या वतीने *दिवाळी स्नेहभेट* देण्यात आली. दिवाळीच्या पर्वावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 


विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी मदतीचा हात पुढे करण्यात रोटी फाऊंडेशन मुंबई कार्यरत आहे. सेवानिवृत्त पोलीस महासंचालक श्री डी शिवानंद यांच्याद्वारे संचालीत रोटी फाऊंडेशन मुंबई द्वारे नागपूर जिल्ह्य़ात विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहे. *आज (ता १६) जागतिक अन्न दिनानिमित्त धर्मराज प्राथमिक माध्यमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना समोसा, केळी, मिठाई व चिक्की* या साहित्याचे वाटप करुन दिवाळी स्नेहभेट साजरी करण्यात आली. 
*मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक व रोटी फाऊंडेशनचे समन्वयक श्री सी. एम. बगडीया यांच्या सहकार्याने व मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी १५०० विद्यार्थ्यांना दिवाळी स्नेहभेट देण्यात आली* 


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक व रोटी फाऊंडेशनचे समन्वयक श्री सी. एम. बगडीया, ओबीसी चळवळीचे शिलेदार व रोटी फाऊंडेशन मुंबईचे समन्वयक श्री संजय पन्नासे, मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, रोटी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक श्री संजय सरकार, पर्यवेक्षक श्री मोहन भेलकर उपस्थित होते.


शालेय विद्यार्थ्यांना शालेय वयातच मदतीचा व प्रेमाचा हात हवा असतो. हा हात योग्य वेळी मिळाल्यास विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकास परिपक्व होत असल्याचे मत कार्यक्रमाचे आयोजक मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. 
उपस्थितांचे आभार श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षकवृंदांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा