दिनविशेष
*🇮🇳 राष्ट्रगीत*
*🚩 राज्यगीत*
*🇮🇳 प्रतिज्ञा*
*🇪🇺 संविधान*
*👏🏻 प्रार्थना*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*🪀 सुविचार*
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*🪀 म्हण व अर्थ*
*म्हण* : आधीच तारे, त्यात गेले वारे.
*अर्थ* : विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*🪀 २७ जानेवारी दिनविशेष*
हा वर्षातील २७ वा दिवस आहे.
*🪀 महत्त्वाच्या घटना*
१८८८ : वॉशिंग्टन डी. सी. येथे ‘द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी’ ची स्थापना.
१९४४ : दुसरे महायुद्ध - ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.
१९४५ : दुसरे महायुद्ध - रशियाच्या ’रेड आर्मी’ने पोलंडमधील ’ऑस्विच’ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.
१९६७ : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.
१९७३ : पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*🪀 जन्मदिवस / जयंती*
१९०१ : लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी - महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष, १९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ’तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली. (मृत्यू : २७ मे १९९४)
१९२२ : अजित खान ऊर्फ ’अजित’ - हिन्दी चित्रपटांतील खलनायक. (मृत्यू : २२ आक्टोबर १९९८)
१९२६ : जनरल अरुणकुमार वैद्य - भारताचे १३ वे लष्करप्रमुख. (मृत्यू : १० ऑगस्ट १९८६)
१९६७ : बॉबी देओल - हिन्दी चित्रपट कलाकार.
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*🪀 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन*
१९६८ : सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ - नाटककार व साहित्यिक. (जन्म : २६ मे १९०२)
१९८६ : निखिल बॅनर्जी - मैहर घराण्याचे सतारवादक. (जन्म : १४ आक्टोबर १९३१)
२००७ : कमलेश्वर - पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक. (जन्म : ६ डिसेंबर १९३२)
२००८ : सुहार्तो - इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष. (जन्म : ८ जून १९२१)
२००९ : आर. वेंकटरमण - भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी. (जन्म : ४ डिसेंबर १९१०)
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*🪀 देशभक्ती गीत*
*गीत गा रहे हैं आज हम...*
आ गयें यहाँ जहाँ कदम,
जिंदगी को ढूंढते हुए
गीत गा रहे हैं आज हम,
रागिनी को ढूंढते हुए ॥धृ॥
अब दिलों में ये उमंग हैं,
ये जहाँ नया बनायेंगे
जिंदगी का दौर आज से,
दोस्तों को हम सिखायेंगे
फुल हम नया खिलायेंगे,
ताजगी को ढूंढते हुए ॥१॥
दहेज का बुरा रिवाज हैं,
आज देश के समाज में
हुआ तबाह आज आदमी
लुटपाट के समाज में हम
समाज भी बनायेंगे
आदमी को ढूंढते हुए ॥२॥
फिर ना ड्र सके कोई दुल्हन, जोर जुल्म का न हो निशा मुस्कुरा उठें धरा गगन, हम रचेंगे ऐसी दास्ताँ हम वतन को यु सजायेंगे, रोशनी को ढूँढते हुए ॥३॥
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*🪀 बोधकथा*
*सिंह, लांडगा आणि कोल्हा*
एका जंगलामध्ये एक सिंह राहत होता. जंगलाचा राजा व सर्व जनावरांचा राजा होता. तू एके दिवशी खूप आजारी पडला. त्यावर खूप औषध उपचार केले पण त्याला काहीही फरक पडला नाही. त्याची पाहणी करण्यासाठी सगळे प्राणी त्याच्याकडे येत. मात्र कोल्हाचे लांडग्यशी वैर असल्या कारणाने येत नव्हता.
लांडग्याने सिंहाला सांगितले की महाराज आपल्या दरबारामध्ये कोल्हा आजकाल हजर राहत नाही. चित्तो आपल्या विरोधी सोबत काहीतरी कारस्थान तर करत आहे असं मला वाटते.
लांडग्याची बोलणे ऐकून सिंहाला कोल्ह्याविषयी संशय येतो तो त्याला ताबडतोब बोलवण्याच्या प्राण्यांना आदेश येतो.
ज्याच्या हुकुमावरून प्राणी कोल्ह्याला दरबारात घेऊन हजर होतात. राजा त्या कोल्ह्याला विचारतो काय रे मी इतका आजारी असताना पण तू माझी पाहणी करण्यासाठी आला नाही. चे काय कारण आहे बरे?
कोल्हा यावर उत्तर देतो की महाराज मी तुमच्यासाठीच एक चांगला वैद्य शोधत होतो. शेवटी एक काल मोठा वैद्य भेटला त्याचा आपल्या प्रकृती संधी सांगितले तेव्हा त्याने सांगितले की लांडग्याचे ओले कातडे पांगरल्यावर हा रोग बरा होईल. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कोल्ह्याचे लबाडपणाचे बोलणे राजाला खरे वाटले व त्यांनी कातड्यासाठी लांडग्याचा तात्काळ प्राण घेण्याचे आदेश दिले.
*तात्पर्य :* दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धारण करणाऱ्यांनी लोकांना बहुदा स्वतःचा नाश पावतो.
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*🪀 सामान्य ज्ञान*
१) भारतास किती किलोमिटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?
उत्तर : ७५१६ किलोमिटर
२) महाराष्ट्रास किती किलोमिटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?
उत्तर : ७२० किलोमिटर
३) पहिले भारतीय वैमानिक कोण ?
उत्तर : पुरूषोत्तम काबली
४) भारताचे पहिले क्रिकेट कसोटीपटू कोण ?
उत्तर : रणजित सिंग
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*🪀 थोरव्यक्ती परिचय*
*राष्ट्रपिता महात्मा गांधी*
स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते
[२ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८]
महात्मा गांधी म्हणजेच मोहन दास करमचंद गांधी ह्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील राजकोट येथे दिवाण होते. त्यांची आई एक धार्मिक स्त्री होत्या. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आणि देशाला स्वतंत्र करण्यात भाग घेतल्यामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणतात.
हे नाव त्यांना सर्वप्रथम नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांनी दिले. महात्मा गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर इंग्लंड गेले होते जिथे त्यांनी न्यायशासनाचा अभ्यास केला. नंतर त्यांनी अॅडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर बॅरिस्टर म्हणून भारतात परतले आणि मग मुंबईत वकील म्हणून काम करू लागले.
महात्मा गांधी ह्यांना त्यांच्या एका भारतीय मित्राने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत बोलावले होते. इथूनच त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिका गेल्यावर त्यांना एक विचित्र प्रकार अनुभवायला मिळाला. त्यांनी बघितले की कशा प्रकारे भारतीयांशी भेदभाव केला जात आहे.
एकदा गांधीजींना स्वतः एका ब्रिटिश गोऱ्या वर्णाच्या माणसाने ट्रेनमधून बाहेर काढले होते कारण गांधीजी त्या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीतून प्रवास करत होते. त्या काळात फक्त गोरे माणसंच फर्स्ट क्लास मधून प्रवास करणं आपला हक्क समजायचे. गांधीजींनी या घडलेल्या गोष्टीवरून प्रतिज्ञा घेतली की ते काळे आणि भारतीय लोकांसाठी लढतील. त्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या जीवनासाठी सुधार केले त्यासाठी काही चळवळी केल्या. दक्षिण आफ्रिकेमध्ये चळवळीच्या दरम्यान त्यांना सत्य आणि अहिंसा याचे महत्त्व समजले. भारतात परत आल्यावर त्यांना तशीच परिस्थिती दिसली जशी त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसली होती. १९२० मध्ये त्यांनी नागरी अवज्ञा चळवळ सुरू केली आणि ब्रिटिशांना आव्हान दिले. १९३० मध्ये असहकार चळवळ ची स्थापना केली आणि १९४२ मध्ये त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास सांगितले. स्वातंत्र्याच्या चळवळीत ते अनेक वेळा तुरुंगात देखील गेले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाले. परंतु दुर्दैवाने नाथूराम गोडसे नावाच्या व्यक्तीने ३० जानेवारी १९४८ रोजी ते संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना महात्मा गांधी ह्यांची गोळ्या घालून हत्या केली. शेवटी त्यांच्या मुखातून 'हे राम' शब्द निघाले.
रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता राम,
ईश्वर अल्लाह तेरो नाम , सबको सन्मति दे भगवान ।... हे त्यांच्या आवडीचे भजन होते.
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
|🇮🇳
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
https://www.vpssteacherassociation.com
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Qaa
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा