*ग्रामीण भागातून दर्जेदार एकलव्य घडवा - खासदार श्री श्यामकुमार बर्वे*
*प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथे स्नेहसंमेलन-२०२५ साजरे*
रामटेक - आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच देशाला दिशादर्शक देणारे एकलव्य तयार करा, असे आवाहन खासदार श्री श्यामकुमार बर्वे यांनी केले.
आज (ता २२) प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथे सांस्कृतिक स्नेहसंमेलन - २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटक म्हणून खासदार श्री श्यामकुमार बर्वे बोलत होते.
आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे वारंवार कानावर पडते. मात्र, प्रकाश हायस्कूल कांद्री माईनने हा शब्द खोटा ठरविला असून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. मुख्याध्यापक श्री वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शाळा व विद्यार्थी प्रगतीचे यशशिखर गाठेल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री डॉ राजेंद्र दखने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले, कार्मिक अधिकारी अॅड अमित कुमार सिंग, गटशिक्षणाधिकारी श्री विजय भाकरे, सरपंच श्रीमती ममता बन्सोड, पंचायत समिती सदस्य सौ.रिता कठौते ,ग्रामहित शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ रश्मी वर्मा ,ग्राम पंचायत सदस्य सपना गोदुले, गौतमी राऊत, अमोल डोंगे, मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते.
यावेळी शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी सुध्दा मनोगत व्यक्त करीत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईनचे अभिनंदन केले.
या सांस्कृतिक स्नेहसंमेलन २०२५ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दिलखेचक २२ नृत्य सादर केले. प्रत्येक नृत्याला बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले
कार्यक्रमाचे संचालन सौ. कामिनी पाटील यांनी तर आभार सौ सुचिता नागपूरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री श्याम गासमवार, श्री विजय लांडे, श्री अशोक नाटकर, श्री प्रशांत सरपाते, सौ.अनिता खंडाईत, कु. ज्योत्सना मेश्राम, श्री बसंत ठकराले, श्री प्रभाकर खंडाते, श्री मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा