*दहावी बारावी परीक्षा आयोजनातील बदल रद्द*
*विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे यश*
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक फेब्रुवारी व मार्च 2025 परीक्षेसाठी नियुक्त होणाऱ्या पर्यवेक्षक /केंद्र संचालक यांच्या अंतर्गत बदलीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरने सदर निर्णयाचा जोरदार विरोध करत पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष पुणे आणि विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांना पत्र देऊन निर्णय रद्द करुन शिक्षकांवरील विश्वास कायम ठेवण्याची मागणी केली होती.
शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांनी विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरची मागणी मान्य करून दहावी बारावीच्या परीक्षा आयोजनातील अदलाबदलीचा निर्णय रद्द केला आहे. संघटनेच्या वतीने नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री चिंतामण वंजारी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, श्री राजू हारगुडे, श्री शेषराव खार्डे, सौ नंदा भोयर, श्री नंदू भुते, सौ पुष्पा बढिये, श्री रंगराव पाटील, श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री कमलेश सहारे, प्रा डॉ निता वानखेडे, श्री गणेश खोब्रागडे उपस्थित होते.
आपला स्नेहांकित
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
संस्थापक अध्यक्ष
*विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा