*समाजाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील रहा - पोलीस उपनिरीक्षक कांचन उईके*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन येथे निरोप समारंभ*
कान्द्री-माईन- येथील प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे इयत्ता 10 वी व 12वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्राचार्य श्री मिलिंद वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
प्रमुख पाहूणे म्हणून गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक व माजी विद्यार्थी कांचन उईके, केंद्रप्रमुख श्री प्रकाश महल्ले उपस्थित होते. यावेळी वर्ग बारावीचे ईशा नाईक, पायल नायले व वर्ग दहावीच्या सम्यक खोब्रागडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शाळेत पाचवी ते बारावी पर्यंत शाळेत आलेले अनुभव कथन केले.
याप्रसंगी प्रा अनिता खंडाईत, अशोक नाटकर, विजय लांडे, सुचिता बिरोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपले स्वतःचे भविष्य घडविणे आपल्या हातात आहे हे विविध दाखले देऊन समजावून सांगितले. प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी अध्यक्षीय भाषणात "तुम्ही सर्व आदिवासी भागातील शेतकरी कुटुंबातील मुलं मुली असून व्यासंगी आणि उपक्रमशील शिक्षकांच्या हातून शिकलेले आहात. यापुढेही तुम्ही चांगले शिक्षण घेऊन सर्वांच्याच प्रगतीत हातभार लावा. उच्च शिक्षण घेऊन आपले जीवन यशस्वी करा " असे विचार व्यक्त केले.
पोलीस उपनिरीक्षक कांचन उईके यांनी शाळेत शिकत असणारा अनुभव व गरजवंताना मी स्वतःच मदत करतो आपण थेट फोन करा. नविन सत्रात एम पी एस सी चे स्पर्धात्मक वर्ग घेण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्योत्सना मेश्राम यांनी तर आभार श्री प्रशांत सरपाते यांनी मानले. यावेळी बारावीचा उत्कृष्ट नान्सी गोदुले तर वर्ग 10 चा विद्यार्थी सम्यक खोब्रागडे यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा